मुंबई : भारतीय शेअर बाजाराची नियामक संस्था सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी वांद्रे-कुर्ला येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयात दि. २९ जानेवारी २०२४ सोमवारी ब्रोकर्स इंडस्ट्री स्टँडर्ड्स फोरम (आयएसएफ) च्या सहभागींशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आयएसएफच्या कामाचे कौतुक केले.
माधबी पुरी बुच म्हणाल्या की, "सप्टेंबर २०२३ मध्ये आयएसएफची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासूनच आयएसएफने नियामक निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांवर अंमलबजावणी करण्यायोग्य शिफारशी सेबीकडे केल्या आहेत. त्यांचे मागील चार महिन्यातील काम प्रशंसनीय आहे.
ब्रोकर्स आयएसएफची स्थापना सप्टेंबर २०२३ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर विविध नियामक निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग मानकांची शिफारस करण्यासाठी करण्यात आली होती. पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, स्टॉकब्रोकिंग क्रियाकलापांच्या कामकाजाच्या विविध नियामक आणि ऑपरेशनल पैलूंवर मानकांची शिफारस या मंचाने सेबीकडे केली. आयएसएफच्या बहुतांश शिफारशी सेबीने मान्य केल्या आहेत.
आयएसएफमध्ये शेयर बाजारातील सर्वच भागीदारांचा समावेश आहे. आयएसएफमध्ये असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया (एएनएमआय), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम (बीबीएफ) आणि कमोडिटी पार्टिसिपंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीपीएआय), इत्यादी संस्था आणि त्यासोबतच ब्रोकर सदस्य संघटना, ब्रोकर आयएसएफचे सदस्य, मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था (स्टॉक एक्स्चेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीज), पात्र स्टॉक ब्रोकर्सचे प्रतिनिधी, उच्च फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग फर्म्स, कस्टोडियन, इत्यादींचा सहभाग आयएसएफमध्ये आहे.
ब्रोकर्स आयएसएफचेचे सध्याचे पदाधिकारी श्री नीरव गांधी (सह-अध्यक्ष सदस्य असोसिएशन बाजू), श्री पीयूष चौरसिया (सह-अध्यक्ष मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन बाजू) आणि श्री उत्तम बागरी (शेर्पा) आहेत. या कार्यक्रमाला सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यासह असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय मेहता उत्सुक आहोत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ब्रोकर्स फोरम (बीबीएफ) चे अध्यक्ष किशोर कंसाग्रा, कमोडिटी पार्टिसिपंट असोसिएशन ऑफ इंडिया (सीपीएआय) चे अध्यक्ष नरिंदर वाधवा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.