शीना बोरा हत्याकांडावर आधारित वेब मालिका 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

    29-Jan-2024
Total Views |
 
netflix series
 
मुंबई : देशात २०१५ साली झालेल्या शीना बोरा हत्याकांडामुळे हाहाकार माजला होता. आपल्या पोटच्याच मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीवर करण्यात आळा होता. आता याच सत्यघटनेवर आधारित डॉक्युमेंट्री वेब मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ' असे या वेब मालिकेचे नाव असून या मालिकेचे पोस्टर समोर आले आहे. शीना बोरा हत्याकांडावर भाष्य करणाऱ्या या वेब मालिकेचे चार सीझन भेटीला येणार आहेत.
 
२३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या वेब मालिकेचे दिग्दर्शन शाना लेवी आणि उराज बहल यांनी केले आहे. या डॉक्युमेंट्री मालिकेमध्ये प्रथमच इंद्राणी, पीटर आणि राहुल मुखर्जी यांच्यातीलकॉल रेकॉर्डिंग आणि कुटुंबाची न पाहिलेली छायाचित्रे देखील दाखवली जाणार आहेत.
 

netflix 
 
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, या मालिकेत इंद्राणी मुखर्जी, तिची मुले विधी मुखर्जी आणि मिखाईल बोरा, ज्येष्ठ पत्रकार आणि वकील आहेत, या प्रकरणाबद्दल बोलतील. तसेच, सध्या इंद्राणी मुखर्जी जामिनावर बाहेर आहे.