मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने रणमैदान तापू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली फौज मैदानात उतरवली असून, २३ राज्यांसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. बहुचर्चित बिहारची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, प्रकाश जावडेकर यांना केरळची खिंड लढविण्याची सूचना करण्यात आली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मान्यतेने २३ राज्ये आणि केंद्रशाशित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी शनिवार, दि. २७ जानेवारी रोजी केली. लोकसभेच्या सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशची जबाबदारी बैजयंत पांडा यांच्याकडे, बिहार विनोद तावडे, तर पश्चिम बंगालसाठी मंगल पांडे, अमित मालवीय, आशा लकडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महेंद्र सिंह यांना मध्य प्रदेशचे प्रभारी, तर सतीश उपाध्याय यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुष्यंत कुमार गौतम यांच्याकडे उत्तराखंडची कमान सोपवण्यात आली आहे. केरळसाठी प्रकाश जावडेकर, तर कर्नाटकसाठी राधामोहन दास अग्रवाल यांना प्रभारी आणि सुधाकर रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हरियाणासाठी विप्लव कुमार देव यांची प्रभारी आणि सुरेंद्र नागर यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
भाजपचे लोकसभा प्रभारी
अंदमान निकोबार - वाय. सत्या कुमार
अरुणाचल प्रदेश - अशोक सिंघल
बिहार - विनोद तावडे, दीपक प्रकाश
चंडीगढ़ - विजय रुपाणी
दीव दमण - पुरनेश मोदी, दुष्यंत पटेल
गोवा - आशिष सूद
हरियाणा - बिप्लब कुमार देव, सुरेंद्र नागर
हिमाचल प्रदेश - श्रीकांत शर्मा, संजय टंडन
जम्मू आणि काश्मिर - तरुण चुघ, आशीष सूद
झारखंड - लक्ष्मीकांत बाजपेयी
कर्नाटक - डॉ. राधा मोहन दास अग्रवाल, सुधाकर रेड्डी
केरळ - प्रकाश जावडेकर
लडाख - तरुण चुघ
लक्षव्दीप - अरविंद मेनन
मध्य प्रदेश - डॉ. महेंद्र सिंह, सतीश उपाध्याय
ओडिशा - विजयपाल सिंह तोमर, लता उसेंडी
पुद्दुचेरी - निर्मल कुमार सुराणा
पंजाब - विजय रूपाणी, डॉ. नरिंदर सिंह
सिक्किम - डॉ. दिलीप जायसवाल
तामिळनाडू - अरविंद मेनन, सुधाकर रेड्डी
उत्तर प्रदेश - वैजयंत पांडा
उत्तराखंड - दुष्यन्त कुमार गौतम
पश्चिम बंगाल - मंगल पांडे, अमित मालवीय, आशा लकडा