मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ग्रॅन्ड चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक संजल लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल अशी तिघडी दिसणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद २०२५ च्या नाताळमध्ये घेता येणार आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाचं आगामी चित्रपटाचं नाव 'लव्ह अँड वॉर' असं आहे. नुकतीच आलिया आणि विकीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. आलियाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर 'संजय लीला भन्साळी यांचा इपिक सागा "लव्ह अँड वॉर" ख्रिसमस २०२५ मध्ये येत आहे. सी यू एट द मुव्हिज' असं लिहिलेलं असून आलियाने पुढे, “एक चिरंतन सिनेमाचे स्वप्न साकार झाले", असेही लिहिले आहे.
रणबीर आणि आलियाने यापुर्वी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांत काम केले होते. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या सावरिया या चित्रपटातून रणबीरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर आलियाने भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.