महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर!

पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील ११३२ जवानांना शौर्य/सेवा पदके जाहीर

    25-Jan-2024
Total Views |
Presidents Medal news


नवी दिल्ली
: ७५व्या प्रजासत्ताक दिन - २०२४ निमित्त, पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, १८ पोलिस अधिका-यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत ४० पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन सेवेसाठी, सात पदके गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ कारागृह अधिका-यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील एकूण ७८ पोलिस अधिका-यांना तर सहा अग्निशमन विभागातील सहा अधिका-यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाला आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या यादीत चार श्रेणींमध्ये पुरस्काराची घोषणा झाली आहे. यात, दोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ (पीएमजी), २७५ पोलीस अधिका-यांना ‘पोलीस शौर्य पदक’ (जीएम) तर विशिष्ट सेवेकरिता १०२ ‘राष्ट्रपती पदक’ (पीएसएम) तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ७५३ पदके जाहीर झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण ८४ पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सहा अग्निशमन सेवेसाठी सहा पदकांचाही समावेश आहे.
 
यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या पदकांच्या नुकत्याच झालेल्या पुनर्रचनेनंतर, प्रजासत्ताक दिन २०२४ निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत.विविध पदकांचा सन्मान करण्यासाठीची संपूर्ण पदक व्यवस्था तर्कसंगत करण्यासह त्यात परिवर्तन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असल्याने, या अनुषंगाने , सोळा शौर्य/सेवा पदके (पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेसाठी) तर्कसंगत करण्यात आली असून चार पदकांमध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG)शौर्य पदक (GM), विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)या श्रेणींमध्ये विलीन करण्यात आली आहेत.

पदक प्राप्त महाराष्ट्रातील अधिका-यांची यादी पुढील प्रमाणे:


प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्य पदक (GM) पुरस्कारासाठी पुरस्‍कारार्थींची यादी- २०२४


१. संकेत सतीश गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी.
२. कमलेश निखेल नैताम, नाईक पोलीस हवालदार
३. शंकर पोचम बचलवार,नाईक पोलीस हवालदार
४. मुन्शी मासा मडावी ,नाईक पोलीस हवालदार
५. सूरज देविदास चौधरी ,पोलीस हवालदार
६. सोमय विनायक मुंडे, भारतीय पोलीस सेवा (IPS) अतिरिक्त पोलिस अधीक्षक (SP)
७. मोहन लच्छू उसेंडी, हेडकॉन्सटेबल
८. देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम,नाईक पोलीस हवालदार
९. संजय वट्टे वाचामी ,नाईक पोलीस हवालदार
१०. विनोद मोतीराम मडावी ,नाईक पोलीस हवालदार
११. गुरुदेव महारुराम धुर्वे ,नाईक पोलीस हवालदार
१२. दुर्गेश देविदास मेश्राम, नाईक पोलीस हवालदार
१३. हिराजी पितांबर नेवारे, पोलीस हवालदार
१४.श्री ज्योतिराम बापू वेलाडी, पोलीस हवालदार
१५. माधव कोरके मडावी, नाईक पोलीस हवालदार
१६. जीवन बुधाजी नरोटे,नाईक पोलीस हवालदार
१७. विजय बाबुराव वड्डेटवार, पोलीस हवालदार
१८. कैलास श्रावण गेडाम,पोलीस हवालदार
विशिष्ट सेवा (PSM) प्रजासत्ताक दिन २०२४ साठी राष्ट्रपती पदक
१. निकेत रमेशकुमार कौशिक, अतिरिक्त पोलीस महासंचालक.
२. मधुकर श्योगोविंद पांडे, पोलिस आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार.
३. दिलीप रघुनाथ सावंत, विशेष पोलीस महानिरीक्षक .
४. मधुकर शिवाजी कड, पोलीस निरीक्षक.


गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)


पोलीस सेवा 
१. सत्य नारायण इंद्रजराम चौधरी, सह पोलीस आयुक्त (L&O).
२. संजय भीमराव पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त.
३. दिपकमंत निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त.
४. मती राधिका सुनील फडके, पोलीस उपअधीक्षक (गृह).
५. प्रदीप रामचंद्र वारंग, पोलीस निरीक्षक.
६. सुनील रामदास लाहिगुडे, पोलीस उपअधीक्षक.
७. विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी .
८. माणिक विठ्ठलराव बेद्रे, पोलीस निरीक्षक.
९. योगेश मारुती चव्हाण, पोलीस निरीक्षक.
१०. संजय राजाराम मोहिते, पोलीस निरीक्षक.
११. सुरेश दिनकर कदम, पोलीस निरीक्षक.
१२. रणवीर प्रकाश बायस, पोलीस निरीक्षक.
१३. वसंतराव दादासो बाबर, पोलीस निरीक्षक.
१४.श्री. जयंत वासुदेवराव राऊत, पोलीस निरीक्षक.
१५. महेशकुमार नवलसिंग ठाकूर, पोलीस निरीक्षक.
१६. सुनील भिवाजी दोरगे, पोलीस निरीक्षक.
१७. सचिन राजाराम गावस, पोलीस निरीक्षक.
१८. मिलिंद यशवंत बुचके, पोलीस बिनतारी निरिक्षक.
१९. सुशीलकुमार सुरेशराव झोडगेकर, पोलीस उपनिरीक्षक.
२०. हरिश्चंद्र विठोबा जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक.
२१. सुहास सखाराम मिसाळ, पोलीस उपनिरीक्षक.
२२. किशोर शांताराम नलावडे, पोलीस उपनिरीक्षक.
२३. विनय राजाराम देवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
२४. राजेंद्ररंग शिरतोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी.
२५. उत्तम राजाराम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक.
२६. किशोर राजाराम सुर्वे, पोलीस निरीक्षक.
२७.श्री प्रकाश महादेव परब, पोलीस उपनिरीक्षक.
२८. सदाशिव आत्माराम साटम, पोलीस उपनिरीक्षक.
२९. अशोक लक्ष्मण काकड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
३०. प्रमोद रामभाऊ आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
३१. राजेंद्रभाऊ घाडीगावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
३२. दिलीप शिवाजी तडाखे, पोलीस निरीक्षक.
३३. नंदू रामभाऊ उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
३४. नितीन विश्वनाथ संधान, पोलीस हेड कॉन्स्टेबल.
३५. संदिप अर्जुन हिवाळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
३६. सुनील हिंदुराव देटके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
३७.श्री शाबासखान दिलावरखान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
३८.मती सीमा अप्पा डोंगरीटोट, महिला हेड कॉन्स्टेबल.
३९. विजय भास्कर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल.
४०. देवाजी कोट्टूजी कोवासे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.


अग्निशमन सेवा
१. अनिल वसंत परब, उपमुख्य अग्निशमन अधिकारी.
२.श्री हरिश्चंद्र रघु शेट्टी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी.
३.श्री देवेंद्र शिवाजी पाटील, विभागीय अग्निशमन अधिकारी .
४. राजाराम निवृत्ती कुदळे, उप अधिकारी.
५. किशोर जयराम म्हात्रे, लीडिंग फायरमन, महाराष्ट्र.
६. मुरलीधर अनाजी आंधळे, लीडिंग फायरमन, महाराष्ट्र.
गृहरक्षक आणि नागरी संरक्षण
१.डॉ. रश्मी प्रकाशचंद्र करंदीकर, वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशासन आणि धोरण)
२. संजय यशवंत जाधव, नागरी संरक्षण अतिरिक्त नियंत्रक, बृहन्मुंबई
३.श्रीमती राजेश्वरी गंगाधर कोरी, कमांडंट, वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण)
४.रवींद्र प्रभाकर चरडे, प्लाटून कमांडर
५.तेजराव परिहर, केंद्र कमांडर
६.अमित शंकरराव तिमांडे, होम गार्ड सार्जंट
७. योगेश एकनाथ जाधव, होम गार्ड

सुधारात्मक सेवा
१. रुक्माजी भुमन्ना नरोड, जेलर ग्रुप I
२. सुनील यशवंत पाटील, जेलर ग्रुप I
३. नामदेव संभाजी भोसले, हवालदार
४. संतोष रामनाथ जगदाळे, हवालदार
५. नवनाथ सोपान भोसले, हवालदार
६. बळीराम पर्वत पाटील, सुभेदार
७. सतीश बापूराव गुंगे, सुभेदार
८. सूर्यकांत पांडुरंग पाटील, हवालदार
९. विठ्ठलराम उगले, हवालदार