नवी दिल्ली : भारतीय क्षेपणास्त्रांना जगभरातून मागणी आहे. येत्या १० दिवसात भारत फिलिपाईन्स ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रासाठी ग्राउंड सिस्टमची निर्यात सुरू करणार आहे.
क्षेपणास्त्रांच्या निर्यातीची माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी दिली आहे. ते म्हणाले ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिला संच मार्चच्या अखेरीस फिलिपाइन्समध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रे मार्चपर्यंत येण्याची अपेक्षा असलेल्या ग्राउंड सिस्टम यंत्रणा येत्या १० दिवसांत पाठवण्यात येणार आहे.
फिलिपाइन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यात हा भारताने आतापर्यंत कोणत्याही देशासोबत केलेला सर्वात मोठा संरक्षण निर्यात करार आहे. ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या पुरवठ्यासाठी भारताने जानेवारी २०२२ मध्ये फिलिपाइन्ससोबत ३७५ दशलक्ष डॉलरचा करार केला होता.
संरक्षण क्षेत्रात निर्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे डीआरडीओचे अध्यक्ष म्हणाले. ते म्हणाले की, मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत निर्यात हा आमच्या पोर्टफोलिओचा एक महत्त्वाचा भाग बनणार आहे. कामत म्हणाले की, पूर्वीपेक्षा आता विकास वेगाने होत आहे. गेल्या 5-7 वर्षांत 60 टक्के किंवा 70 टक्क्यांहून अधिक उत्पादने जोडली गेली आहेत. जसजसे पुढे जाल तसतसा हा दर झपाट्याने वाढेल.