फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारतात दाखल; 'या' प्रसिद्ध ठिकाणाला देणार भेट

    25-Jan-2024
Total Views | 41
 MACRON
 
जयपूर : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे पाहूणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात दाखल झाले आहेत. मॅक्रॉन त्यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात आज जयपूर येथे पोहोचले. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केले.
 
मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॅक्रॉन जयपूरमधील प्रसिद्ध आमेर किल्लाला पाहण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्या स्मरणार्थ तेथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जयपूर येथील आमेर किल्ल्यावर राजस्थानी चित्रकलेचे कौतुक केले आणि कलाकारांशी संवाद साधला.
 
आमेरच्या किल्लानंतर मॅक्रॉन जयपूरच्या प्रसिद्ध हवा महलला भेट देतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते ताज रामबाग पॅलेसमध्ये द्विपक्षीय बैठक करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121