मुंबई : अयोध्येत प्रभू रामाचे मंदिर आज २२ जानेवारी २०२४ रोजी अखेर ५०० वर्षांनी उभारले जाणार असून देशातीलच नव्हे तर जगातील सर्व रामभक्त रामाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार देखील अयोध्येत प्रभू रामाच्या आगमनासाठी पोहोचले असून यात अभिनेत्री कंगना राणावत हिचाही समावेश आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ‘आज रामललला संपुर्ण देशाला मार्गदर्शन करणार', असे कंगानाने म्हटले आहे.
कंगना म्हणाली की, “आज अयोध्येत आल्यानंतर पौराणिक काळात गेल्यासारखे वाटत आहे. त्याकाळी मोठ-मोठे यज्ञ आणि हवन होत असतं, जिथे देव, गंधर्व स्वत: त्या पुजेसाठी येत असतं असे सांगितले जात होते. असाच काहीसा अद्भूत आणि अलौकिक हा प्रभू श्री रामाच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. तसेच, विकासासंबधी भाष्य करायचे झाल्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तर प्रदेशचा कायापालट केला आहे. आणि आज रामललला संपुर्ण देशाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे अयोध्येत रंगणारा हा ऐतिहासिक सोहळा विश्वातील रामभक्तांसाठी अविस्मरणीय क्षण असणार आहे”, अशा भावना कंगना रामावत हिने व्यक्त केल्या.
दरम्यान, रजनीकांत, चिरंजीवी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रोहित शेट्टी, आयुष्यमान खुरानासह क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकर देखील अयोध्येत पोहोचले आहेत. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात जयश्री रामाचा जयघोष सुरु असून गायक सोनू निगम, गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजातून रामाची गाणी ऐकायला उपस्थित मान्यवरांना मिळत आहे.