नवी दिल्ली : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर अयोध्येत श्री राम मंदिर निर्माण झाले नसते' असे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. नेते आचार्य कृष्णम म्हणाले, नरेंद्र मोदी नसते तर श्री राम मंदिर अस्तित्वात आले नसते, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, आचार्य कृष्णम पुढे म्हणाले की, काँग्रेसने अनेकदा भाजपला टार्गेट करत आम्ही मंदिर तिथेच बांधू असे आश्वासन दिले, परंतु, तारीख सांगितली नाही. भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर आज राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
प्राणप्रतिष्ठेचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींचे - आचार्य प्रमोद कृष्णम
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले की, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मालकीचा वाद कायमचा निकाली काढल्यानंतर हे मंदिर बांधण्यात आले. प्रदीर्घ लढाईनंतर आणि पुरातत्व सर्वेक्षणाच्या निष्कर्षांना प्राधान्य देत न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर प्रभू रामलला आपल्या जन्मभूमीत परतणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीचे आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्याचे पूर्ण श्रेय मला पंतप्रधान मोदींना द्यायचे आहे.
अनेक सरकारे निवडून आली आणि अनेक पंतप्रधान आले आणि गेले पण राम मंदिराची ५०० वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणी दाखवली नाही. काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, विहिंप आणि बजरंग दलाच्या सदस्यांनीही खूप बलिदान दिले, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते तर हे मंदिर कधीच साकार झाले नसते.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, आज श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात जय श्री रामचा जयघोष ऐकू येत आहे. आज अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाचा अभिषेक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ हजार पाहुणे हे पाहणार आहेत.