नाशिकच्या काळाराम मंदिरात द्राक्षांची आरास!

    22-Jan-2024
Total Views | 101

Kalaram Temple


नाशिक :
अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा नुकताच पार पडला आहे. दुसरीकडे, राम मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे काळाराम मंदिरदेखील सजले आहे. काळाराम मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमली आहे.
 
काळाराम मंदिरातील प्रभु राम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मुर्तीची फुलांनी सजावट करण्यात आली असून संपुर्ण मंदिरात द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. यावर्षीच्या हंगामातील पहिल्या द्राक्षांची आरास करुन प्रभु श्रीरामाला अर्पण करण्यात आले आहे. ही सजावट सध्या विशेष आकर्णण बनली आहे.
 
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले होते. याशिवाय त्यांनी या मंदिरात साफसफाई करत देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम राबवण्याचे आवाहनही केले होते.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121