OTT मंचही झाला राममय! जाणून घ्या रामायणावर आधारित सिनेमे कोणते आहेत?

    20-Jan-2024
Total Views |

ramayan 
 
देशात सर्वत्र राममय वातावरण झाले आहे. २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी सगळेजण भावूक झाल आहेत. आजवर आपण रामायणावर आधारित अनेक अजरामर कलाकृती पाहिल्या. रामलललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना ओटीटी वाहिनीवर घरबसल्या पाहता येणार आहेत.
 
१९८७ साली टीव्हीवर प्रसारित होणारी रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका आजही इतक्या वर्षांनी लोकप्रिय आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रामायण मालिका तुम्ही घरबसल्या हॉटस्टारवर पाहू शकता.
 

ramayan 
 
२०१८ साली एनडीटीव्ही इमॅजिनवर प्रसारित झालेली गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांची प्रमूख भूमिका असलेली 'रामायण' ही मालिका गाजली होती. आता ही मालिका अॅमेझॉन प्राइमवर पाहता येऊ शकते.
 

ramayan 2 
 
'राम सिया के लव्ह कुश' ही मालिका प्रभू श्रीराम आणि त्यांच्या मुलांवर आधारित होती. २०१९ साली प्रसारित झालेली ही मालिका सध्या जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.
 

lav kush 
 
प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या मुलांवर आधारित असलेला 'लव्ह कुश' हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. यात जितेंद्र, जया प्रदा, अरुण गोविल, दारा सिंग असे कलाकार होते. हा चित्रपट सध्या झी५ वर पाहता येईल.
 

lav kush movie