अयोध्येतील रामललाची मूर्ती पाहून कंगना झाली भावूक, म्हणाली, "माझ्या कल्पनाशक्तीतले प्रभू रामच..."

    20-Jan-2024
Total Views |

kangana 
 
मुंबई : जगभरातील तमाम रामभक्तांचे २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्या राम मंदिर सोहळ्याची उत्सुकता आहे. प्राणप्रतिष्ठेपुर्वीच प्रभू रामचंद्राच्या मुर्तीचा एक फोटो सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या बावना व्यक्त केल्या आहेत.
 
रामलल्लाची मूर्ती पाहून कंगना मंत्रमुग्ध झाली असून तिने रामलल्लाची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगीराज यांचे कौतुक केले आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रामलल्लाच्या मूर्तीचे फोटो शेअर केले आहेत. पुढे तिने लिहीले आहे की, "मला नेहमी वाटायचे की प्रभू राम लहान असताना असे दिसले असतील. आज या मूर्तीने माझी कल्पना जिवंत झाली. अरुण योगीराज तुम्हाला अनेक आशीर्वाद."
 
कंगनाने पुढे लिहिले, "किती सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे. अरुण योगीराज यांच्यावर किती दबाव असेल. आणि परमेश्वराला पाषाणात सामावून घेणं ही खूप कठीण गोष्ट आहे. काय म्हणावं, ही देखील रामाचीच कृपा आहे. अरुण योगीराज श्री रामजींनी स्वतः तुम्हाला दर्शन दिले आहे... तुम्ही धन्य आहात." अशी पोस्ट करत कंगनाने रामलल्लाची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज यांचं कौतुक केले आहे.