महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती

    02-Jan-2024
Total Views | 47
IAS Officer Rajnish Seth as a MPSC President
 
ठाणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे स्विकारला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ.दिलीप पांढरपट्टे, डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात, सहसचिव सुभाष उमराणीकर आदि उपस्थित होते.

आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्य पध्दती विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ही माहिती समजून घेतल्यानंतर सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अतिशय शिस्तबध्दतेने, पारदर्शकपणे करणार असल्याचे स्पष्ट केले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121