ट्रक चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश!

    02-Jan-2024
Total Views |

Shinde


मुंबई :
केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात राज्यभरात ट्रक आणि टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तसेच या परिस्थिची माहिती केंद्राला देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा सुरु केला आहे. या कायद्याअंतर्गत एखादा अपघात झाल्यास वाहनचालक पोलिसांना कुठलीही माहिती न देता फरार झाला तर त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. याशिवाय त्याला सात लाख रुपये दंडदेखील भरावा लागणार आहे. दरम्यान, याविरोधात आता वाहनचालक राज्यभरात संप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संपाची दखल घेतली असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कुठेही तणाव होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती केंद्राला दिली जाणार आहे.