रावेर लोकसभेवरून खडसे-पटोलेंमध्ये रस्सीखेच!

    02-Jan-2024
Total Views |

Eknath Khadse & Nana Patole


मुंबई :
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खडसेंच्या या ईच्छेवर विरजण घातले आहे.
 
रावेर मतदारसंघाची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही जागा मिळाल्यावर प्राधान्याने माझा विचार करावा, अशी विनंती केली असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटले होते. परंतू, आता नाना पटोले यांनी या जागेवर काँग्रेसचा दावा सांगितला आहे.
 
नाना पटोले म्हणाले की, "डॉ. उल्हास पाटील यांनासुद्धा रावेरची जागा लढायची आहे. पण आमच्या पक्षात अशा प्रकारचा आततायीपणा नाही. शेवटी निर्णय हा उच्च स्तरावरच होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन चालत असताना मेरिटच्या आधारावर निर्णय घ्यावा लागतो. कारण जागा जिंकणं महत्त्वाचं आहे आणि जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच येईल. वरच्या पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे खाली कुणी काही बोलत असेल त्याला काही अर्थ नाही," असा टोला त्यांनी लगावला आहे.