विधीमंडळात 'मैं अटल हुं' चित्रपटाचा विशेष शो, राहूल नार्वेकरांची घोषणा
19-Jan-2024
Total Views | 22
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित मैं अटल हुं हा चरित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चरित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटलजींची व्यक्तिरेखा साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटाचा विशेष शो विधिमंडळात दाखवण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.
राहूल नार्वेकर म्हणाले की, “माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित मैं अटल हुं हा अत्यंत प्रभावशाली चरित्रपट आज दिनांक १९ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाचा पहिला शो सर्व विधीमंडळातील सदस्य, कर्मचारी यांच्यासाठी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. आणि मला वाटतं या चित्रपटातून एकूण समाजकारण, राजकारण करत असताना आपली प्रतिमा आणि समाजात एक आदर्श व्यक्तिमत्व कसे बनावे हे या चित्रपटातातून अवगत होते. त्यामुळे या चित्रपटातून समाजात एक अत्यंत चांगला संदेश जाईल, शिवाय तरुण पिढीला लोकप्रतिनिधी कसा असावा, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत? आणि आपले चरित्र, आचार-विचार कसे असावेत हे निश्चितपणे यातून बघायला मिळेल”.