फोर्च्युन एक्झोटिका हॉटेलमध्ये खाद्यपर्वणी; नवीमुंबईच्या 'झोडियाक'मध्ये रंगणार गोवन फूड फेस्टिवल

    19-Jan-2024
Total Views |
goan food festival

मुंबई:
नवी मुंबईत वसलेल्या वाशी येथील फोर्च्युन एक्झोटिका हॉटेलमधील 'झोडियाक' या रेस्टाॅरंटमध्ये गोवन फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. आजूबाजूच्या आगरी-कोळी लोकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० जानेवारी ते दि. २८ जानेवारी दरम्यान या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त येथे बुफे डिनर - लाइव्ह-पिझ्झासह १००+ डिश, लाइव्ह-आईस्क्रीम आणि लाइव्ह शावर्मा, वीकेंडच्या दिवशी लाइव्ह संगीत देखील असते. रुचकर आणि चवीचे पदार्थ खाण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे 'झोडियाक'
 
या फूड फेस्टिवलमध्ये खाद्यप्रेमींना अनेक रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे. सूपमध्ये कांजा - डे-गॅलिना सूप (नॉन व्हेज) आणि कॅल्डो - वर्डे सूप (व्हेज)चा समावेश आहे. तर स्टार्टरसमध्ये बटाटे आणि चीज क्रोकेट, बटाटे चोप कोंबी, मॅश केलेल्या बटाट्यात गुंडाळलेले चिकन व सुंगटा मिरची फ्रायचा समावेश आहे. मत्स्यप्रेमींना गोवा मसाल्याच्या पेस्टमध्ये मॅरीनेट केलेले भरलेली पापलेट तसेच कोळंबी बालचाओने भरलेले संपूर्ण पोमफ्रेटवर तव मारता येणार आहे.
 
या सोबतच नारळाची मसालेदार करी, आंबोट टिक - बांगडा / सुंगटा, पोर्तुगीज मसालेदार करी, समराची कोडी, ताज्या आणि वाळलेल्या कोळंबीने बनवलेली करी आणि पारंपारिक गोवा क्रॅब करीचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच येत्या १४ फेब्रुवारीला लाइव्ह संगीत आणि रोमँटिक थीमसह व्हॅलेंटाईन बुफे डिनरचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. याचे आयोजन करणाऱ्या टीममध्ये फूड अँड बेव्हरेज मॅनेजर - अमित चक्रवर्ती त्यांच्या टीमसह शिहिर, नरदेव, कहजर आणि हेड शेफ - अजित यादव, मास्टर शेफ - महेश सिंग, सूस शेफ - सुचित पांडे यांचा समावेश आहे.