ठाकरेंसोबत राहिल्याने ईडी मागे लागली : किशोरी पेडणेकर
सुरज चव्हाण प्रकरणात किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य
18-Jan-2024
Total Views |
मुंबई : उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याने ईडी मागे लागली असे वक्तव्य उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले सुरज चव्हाण यांना ईडीने बुधवारी अटक केली. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "लोकांना यंत्रणांच्या माध्यमातून दबाव वाढवण्याचा उद्देश दिसत आहे. फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत त्यांच्यामागे बरोबर यंत्रणा आहेत. राजन साळवीदेखील कट्टर शिवसैनिक आहेत. ते यातून निघतील," असेही त्या म्हणाल्या आहेत.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी गुरुवारी एसीबीने धाड टाकली आहे. राजन साळवी यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला असून गुरुवारी सकाळी त्यांच्या चार ठिकाणांवर एसीबीने धाड टाकली.