अजितदादांनी अमोल मिटकरींना मुख्य प्रवक्तेपदावरुन हटवलं!
18-Jan-2024
Total Views |
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य प्रवक्ता पदावरून हटवलं आहे. सहा महिन्यांच्या आतच मिटकरींचे हे पद काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्याऐवजी आता उमेश पाटील यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
अमोल मिटकरींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना या पदावरुन काढण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता मिटकरींनी स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे सात प्रवक्ते असून मीदेखील पक्षाचा प्रवक्ता आहे आणि मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली. तसेच त्यांनी उमेश पाटील यांचे अभिनंदनही केले आहे.
दुसरीकडे. "मुख्य प्रवक्ते हे एक स्वतंत्र पद असून आतापर्यंत या पदावर नियुक्ती झाली नव्हती. याआधी हे पद नवाब मलिकांकडे होतं. त्यानंतर ते आता मला देण्यात आलेलं आहे," अशी माहिती उमेश पाटील यांनी दिली आहे.