मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपुर्ण देश सज्ज झाला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी उणीव भासत आहे.
लता मंगेशकरांबद्दलची एक खास पोस्ट पंतप्रधानांनी शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, "भारतीयांना २२ जानेवारी २०२४ या दिवसाची प्रतिक्षा आहे. यावेळी आपल्याला अनेकांची कमी जाणवत आहे. यातीलच एक म्हणजे लता दीदी. लता दीदींनी गायलेल्या एका श्लोकाचा व्हिडीओ शेअर करत आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींनी हा श्लोक शेवटचा रेकॉर्ड केला होता".