६९व्या फिल्मफेअर चित्रपटात 'या' चित्रपटांनी नामांकनात मारली बाजी

    17-Jan-2024
Total Views |

filmfare  
 
मुंबई : ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा मुंबईऐवजी गुजरातमध्ये रंगणार आहे. नुकतीच या पुरस्कार सोहळ्याची नामांकने समोर आली असून यावेळी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानने बाजी मारली आहे.
 
२०२३ हे वर्ष रणबीर कपूर, सनी देओल, बॉबी देओल यांच्यासाठी खास होतं. याशिवाय विक्रांत मेस्सीच्या १२वी फेल चित्रपटाने तर तरुणाईचे मन जिंकले अशून अनेक विभांगांमध्ये या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. जाणून घेऊयात ६९ व्या फिल्मफेअर चित्रपटाची नामांकने.
 
सर्वोत्कृष्ट चित्रपट
 
१२ वी फेल, अॅनिमल, जवान, ओह माय गॉड २, पठाण, रॉकी और रानी की प्रेम कहानी...
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
 
अमित राय (ओएमजी २), अॅटली (जवान), संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल), सिद्धार्थ आनंद (पठाण), विधु विनोद चोप्रा (१२ वी फेल)
 
सर्वोत्कृष्ट फिल्म क्रिटिक्स
 
१२ वी फेल, भीड (अनुभव सिन्हा), फराज (हंसल मेहता), जोराम (देवाशिष मखीजा), सॅम बहादूर (मेघना गुलजार), थ्री ऑफ अस (अविनाश अरुण धावरे), झिग्वाटो (नंदिता दास)
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता
 
रणबीर कपूर (अॅनिमल), रणवीर सिंह (रॉकी और रानी की प्रेम कहानी), शाहरुख खान (डंकी), शाहरुख खान (जवान), सनी देओल (गदर २), विकी कौशल (सॅम बहादूर)
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटीक्स
 
अभिषेक बच्चन (घुमर), जयदीप अहलावत (थ्री ऑफ अस), मनोज वाजपेयी(जोराम), पंकज त्रिपाठी (ओएमजी २), राजकुमार राव (भीड), विकी कौशल (सॅम बहादूर), विक्रांत मेस्सी (१२ वी फेल)
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
 
आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी), भूमी पेडणेकर (थँक्यू फॉर कमिंग), दीपिका पदुकोन (पठाण), कियारा अडवाणी (सत्यप्रेम की कथा), राणी मुखर्जी (मिसेज चॅटर्जी नॉर्वे), तापसी पन्नु (डंकी)
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स
 
दीप्ती नवल (गोल्डफिश), फातिमा सना शेख (धक धक), रानी मुखर्जी (मिसेज चॅटर्जी नॉर्वे), सयामी खैर (घूमर), शहाना गोस्वामी (झिग्वाटो), शेफाली शहा (थ्री ऑफ अस)
 
सर्वोत्कृष्ट संवाद
 
अब्बास टायरवाला (पठाण), अमित राय (ओएमजी२), इशिता मोईत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी), सुमित अरोडा (जवान), वरुण ग्रोव्हर आणि शोएब जुल्फी नजीर (थ्री ऑफ अस), विधु विनोद चोप्रा (१२ वी फेल)