भारताच्या 'पिनाका' क्षेपणास्राची दक्षिण अमेरिकी देशांमध्ये मागणी!
17-Jan-2024
Total Views | 52
नवी दिल्ली : भारताचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर 'पिनाका'ला खरेदी करण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील दोन देशांनी रस दाखवला आहे. भारतीय सैन्य दलासाठी या रॉकेट लाँचरची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने केलेली आहे. या रॉकेट लाँचरमधून १२० ते २०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करता येतो.
भारताने याआधी पिनाका सिस्टिम आर्मेनियाला विकली आहे. आर्मेनियाने पिनाकाचा वापर अझरबैजानसोबतच्या युद्धात केला होता. या युद्धातील पिनाकाच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या दोन दक्षिण अमेरिकेतील देशांनी ही प्रणाली खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पिनाका प्रणालीचे तंत्रज्ञान डीआरडीओने विकसित केले असली तरी, उत्पादनात खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांना सुद्धा सहभागी करुन घेण्यात आले आहे. पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर ही एक स्वदेशी शस्त्र प्रणाली आहे, जी डीआरडीओने खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या भागीदारीतून विकसित केली आहे.