‘भावी’पण भारी देवा!

    16-Jan-2024
Total Views |

sharad pawar 
 
पंतप्रधान राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान व्रताचरण उपवास करत आहेत. मोदी दहा दिवस उपवास करणार आहेत. तसा देशाची गरिबी घालवण्यासाठी उपवास करणार आहेत का?” इति शरद पवार. काय म्हणावे या विधानाला? राम मंदिर, प्रभू श्रीरामचंद्र, हिंदू, त्यांच्या श्रद्धा वगैरे शब्द जरी कानी पडले तरी पवारांचा तीळपापड होतो. पण, यावर काही लोकांचे म्हणणे की, जेव्हा बघावं तेव्हा इफ्तार पार्ट्या चापत असणार्‍या पवारांनी जरा कमी पार्ट्या केल्या असत्या, तर थोडी गरिबी नक्कीच हटली असती. काहीच नाही तर त्यांच्या लेकीने कोट्यवधींची वांगी पिकवण्याची कला देशातल्या शेतकर्‍यांना शिकवली असती, तर शेतकरी आत्महत्या टळल्या असत्या. असो. स्वतःला ‘पुरोगामी’ वगैरे म्हणवून घेणार्‍या पवारांना काय वाटते की, कुणी उपवास केला की देशाची गरिबी कमी होईल? नाही, पवारांना माहिती आहे की, उपवास हा हिंदू श्रद्धेचा भाग आहे. हिंदू श्रद्धांबाबत वेडेवाकडे बोलले की त्यांचे मतदार खूश होतात. आता त्यांचे मतदार कोण, हे सगळ्यांना ठावूक आहेच. त्यातच त्यांचा ‘सौ दाऊद एक राऊत’ वगैरे वल्गना करणारा ‘नॉटी’ चेलाही आहेच. त्या चेल्याला चघळण्यासाठी काहीतरी विषय हवा म्हणूनही पवार असे काहीबाही मध्ये मध्ये बोलतात, असे लोक म्हणतात. पण, पवारांनी आणि त्यांच्या दुटप्पी चेल्यांनी देशातले वातावरण एकदा तरी पाहावे. ‘राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी’ हे वातावरण नाही, तर ‘राम आयेही हैं और हम सिद्ध हैं’ असे वातावरण सध्या घराघरात आहे. अयोध्येत होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव घराघरातून साजरा होत आहे. या परिक्षेपात पवारांना मोदींच्या उपवासापेक्षा ‘जो नही राम का वो किस काम का’ असे म्हणणार्‍या लोकभावनेचा तिरस्कार. पण, छे भविष्यात काहीही होईल. एक सकाळ अशीही उगवेल की, पवार सगळ्यांना सांगत सुटतील की, ते कसे रामभक्त आहेत. कारसेवेला त्यांचा कसा पाठिंबा होता वगैरे. शेवटी काय कधी पावसात भिजून कधी बिनबुडाची विधानं करून कायम ‘भावी’ राहणे हा एककलमी कार्यक्रम पवार राबवतात. मात्र, ‘इंडिया’ आघाडी तयार झाल्यावर ‘भावी’ पदासाठीही अनेक स्पर्धक तयार झालेे. त्यामुळे आपणच खरे ‘भावी’ आहोत, हे दाखवण्यासाठी पवार वाटेल ते करतात आणि बोलतात, हेच खरे!
 
मीच माझ्या स्वप्नातला...
 
माझी बरोबरी नरेंद्र मोदींसोबतच करतो. ते अयोध्येत पूजा करतील आणि मी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये. मी तर डायरेक्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिले. त्या राष्ट्रपती आणि त्यांच्यासोबत मीच माझ्या स्वप्नातला मुख्यमंत्री. हो हो, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसे हे मीच माझ्या स्वप्नातला मुख्यमंत्री आणि पंतपधानसुद्धा. पण, ते कमळवाले आणि शिंदेचे सोबती आमच्यासोबतच्या लोकांना काहीही म्हणतात. आमच्या बाळाला ‘असरानी’ म्हंटल गेलं आणि आमच्या दूरदृष्टीच्या संजयला ‘मंथरा.’ आता हे कमी होतं की काय, आमच्या पक्षाला ते पत्रकार ‘उबाठा’ म्हणतात? कोण आहे रे तिकडे? छे, आता कुणीही नाहीच म्हणा. त्यांची इतकी हिंमत की, मला ते सोडून गेले. माझ्या कर्तृत्वाचे तरी स्मरण करायला हवे होते ना? काय म्हणता कोणते कर्तृत्व? अहो, साक्षात साहेबांचा मुलगा म्हणून जन्मलो, हेच माझे मोठे कर्तृत्व. काय म्हणता कुणी कुणाच्या पोटी जन्म घेऊन त्यांच्या कर्तृत्वाचा वारसदार होता येत नाही? नसू दे, ज्या क्षणी जन्माला आलो, त्याचक्षणी कळले मला की, वा रे वा आता सात पिढ्या कर्तृत्वशून्य म्हणून जगलो, तरी देशात, समाजात फक्त बापाच्या नावावरच सात पिढ्या तारून नेईन! काय म्हणता, माझ्या पुढच्या सात पिढ्यांना सन्मानही मिळाला असता, पण माझ्या कर्तृत्वहीन वागण्यामुळे तो सन्मान गमावला आहे. त्याआधी झाकली मूठ सव्वा लाखांची होती. आता ती मूठ उघडली आणि त्यातून शिंदे अधिक ४० जण आणि कितीतरी मोती बाहेर पडले. आता मूठ सताड उघडी पडली. असू दे, असू दे. साधी झोपडी बांधताना आयुष्य गहाण ठेवावे लागते लोकांना. माझे कर्तृत्व नसते, तर माझ्याच काळात ‘मातोश्री-२’ कशी बांधली गेली? मी होतो म्हणूनच सगळ्या ज्येष्ठांना वगळून माझ्या बाळाला वरळीतून आमदारकी लढवता आली. मी होतो म्हणूनच तर पहिल्याच फटक्यात माझं बाळ मंत्रीसुद्धा झालं. मी होतो म्हणूनच तर माझ्या सौंच्या नावापुढे ‘संपादक’ म्हणून उपाधीही लागली ना? मी होतो म्हणूनच सगळे घडले ना? काय म्हणता, हे मी माझ्या कुटुंबातील सदस्यांचीच तुंबडी भरली. मग मी आधीच म्हटले होते, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी.’ आता कसं आहे, मी सत्तेत असलो तरच हे सगळे टिकून राहील ना? सत्ता कधी मिळेल? काय म्हणता स्वप्नात?
९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.