नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी (बसपा) अध्यक्षा मायावतींनी आपली भूमिका जाहीर करत इंडी आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या, आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर जाहीर करत आघाडीला जोरदार दणका दिला आहे. त्या पुढे म्हणाल्या, युती केल्याने मतांचे वर्गीकरण होत नाही, त्यामुळे आम्ही कोणाशीही युती करणार नसल्याचे मायावती यांनी यावेळी स्पष्ट केले. आपल्या वाढदिवसाच्या दिनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भाष्य केले आहे.
तसेच, बसपा अध्यक्षा मायावती राष्ट्रीय राजकारणातून निवृत्त होणार अशा वावड्या देखील राजकीय वर्तुळात उठल्या होत्या. त्यावर मायावतींनी पूर्णविराम लावला असून त्या म्हणाल्या, माझ्या राजकीय निवृत्ती चर्चा ह्या अफवा असून मी कुठलीही निवृत्ती घोषणा केलेली नाही. त्यामुळे आम्ही इंडी आघाडीत सहभागी न होता स्वबळावरच आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहोत.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून पंतप्रधान मोदींसह भाजपला शह देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात काँग्रेसकडून विरोधी पक्षांत एकजूट व्हावी याकरिता मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. याकरिता इंडी आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना इंडी आघाडीचे अध्यक्ष त्याचबरोबर पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणूनदेखील त्यांनाच पसंती मिळण्याची शक्यता आहे.