मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज शॉन मार्श याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शॉन मार्शने आस्ट्रेलियाकडून टी-२०, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना अटीतटीच्या सामन्यात संघाला महत्त्वपूर्ण खेळी करत संघासाठी निर्णयात्मक विजय मिळवून दिला आहे.
शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाकडून ७३ एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने २७७३ धावा केल्या आहेत. त्याही जवळपास ३५ सरासरीने काढल्या आहेत. यात ७ शतक आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर, कसोटी सामन्यात ६ शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.
शॉन मार्शने निवृत्ती जाहीर करताना त्याने बीग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर या संघाविरोधात कारकीर्दीतील शेवटचा सामना १७ जानेवारीला खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर शॉनचा भाऊ मिशेल मार्श हा देखील ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसत आहे. शॉन मार्श हा त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे क्रिकेट विश्वात नेहमीच चर्चेत राहिला. याच वर्तनामुळे त्याच्यावर काही सामन्याकरिता बंदीदेखील घालण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.