मुंबई : सहकार भारती वायव्य मुंबई जिल्हा स्थापना दिनानिमित्त आणि ४६ व्या वर्षात पदार्पण केल्या निमित्ताने सहकारी पत संस्था, गृहनिर्माण संस्था, महिला बचत गट कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे संमेलन शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी अंधेरी येथील साई श्रद्धा समिति साई कला मंच येथे संपन्न झाले.
सत्य विजय सावंत यांनी सहकार गीत सांगून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तानाजी गुजर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अनेक वक्त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि सहकार भारती करीत असलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. संतोषजी सुर्वे, सखाराम सुर्वे, सिध्देश्वर कासारे, हरीश हिंगे, देवयानी दळवी, विजय शेलार, रामकृष्ण आवारे यांनी उपस्थितांना सहकारी चळवळ आणि सहकार भारती या क्षेत्रात करीत असलेल्या कामाबद्दल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कोकण विकास सहकारी पत संस्थेच्या आणि दौलत सहकारी संस्था संस्थेचे मराठी दिनदर्शिकाचे प्रकाशन ही कराण्यात आहे. या कार्यक्रमाला सहकार भारती मुंबई विभाग संपर्क प्रमुख संतोष जी सुर्वे, रामकृष्ण आवारे, मुंबई सहकार बोर्डाचे संचालक आणि ईशान्य मुंबई जिल्हा संगठन प्रमुख हरीश हिंगे, सहकार जिल्हा अध्यक्ष आणि दत्त दिगंबर सहकारी पत संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष तानाजी गुजर, संगठन प्रमूख योगेश राणे, सह संगठन प्रमुख सत्य विजय सावंत, मनीषा चव्हाण, स्मिता मोटे, महिला प्रमूख भाग्यश्री मेस्त्री, कोकण विकास सहकारी संस्था अध्यक्ष सखाराम सुर्वे, उपाध्यक्ष रामचंद्र बोभाटे आदी मान्यवर उपस्थित होते.