न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर पाहता येणार प्राणप्रतिष्ठा सोहळा
14-Jan-2024
Total Views |
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जगभर जय्यत तयारी सुरु आहे. दि. २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील ११,००० मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यासोबतच जगभरातील राम भक्तांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो मंदिरातून होणार आहे. त्यासोबतच अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर देखील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासोबतच प्राणप्रतिष्ठा सोहळा जगभरातील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये सुद्धा थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.