मालदीवमध्ये चित्रिकरण करणार नाही नाहीच! 'FWICE'ची आक्रमक भूमिका

    11-Jan-2024
Total Views |

pm modi 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या विधानामुळे सुरु झालेल्या वादावर विविध क्षेत्रातील मंडळींनी निषेध नोंदवत लक्षद्वीपच्या पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. परिणामी मालदिवच्या त्या नेत्यांची हकालपट्टी देखील करण्यात आली. तसेच, मालदीवच्या पर्यटनावरही याचा दुष्परिणाम झालेला दिसून येत आहे.
मालदीवला केवळ पर्यटनस्थळ इतकीच ओळख मर्यादित नसून, तेथे अनेक चित्रपटांचे चित्रिकरण किंवा मॉडेल्सचे फोटोशुट देखील तिथे केले जाते. त्यामुळे आता या प्रकरणात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलोईस संस्थेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
 
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलोईसने हिंदी चित्रपटसृष्टीतील फिल्ममेकर्स आणि कलाकारांना पुढील काळात मालदीवमध्ये चित्रिकरण न करण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. यात त्यांनी असेही म्हटले आहे की, भारतातही मालदीवसारख्या अनेक जागा असून त्यांचा शोध घेत तेथे चित्रिकरण करण्याचे आवाहन एफ.डब्ल्यू.आय.सी.ईने केले आहे. तसेच, सर्व फिल्ममेकर्सर्ने आता मालदीवच्या विरोधात एकत्र येणार येण्याची गरज असल्याचेही यात म्हटले आहे. एफ.डब्ल्यू.आय.सी ने माध्यमांत आणि चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्यांना यापुढील काळात मालदीवच्या विरोधात भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
पुढे असेही म्हटले आहे की, आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर मालदीवच्या मंत्र्यांनी जी भूमिका व्यक्त केली त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच प्रमाणे यापुढील काळात मालदीवमध्ये कोणत्याही प्रकारे हिंदी चित्रपटसृष्टीतून चित्रिकरण होणार नाही याविषयी आमच्या क्षेत्रातील मान्यवर कलाकारांना आवाहन करण्यात आल्याचे एफ.डब्ल्यू.आय.सीच्या वतीनं सांगण्यात आले आहे.