'नेशन फर्स्ट', 'भारत फर्स्ट' दोन 'कूपन कोड' वापरा आणि मिळवा भरघोस सवलत

    11-Jan-2024
Total Views |
 EaseMyTrip announces discount codes

मुंबई :
ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल 'इझ माय ट्रिप'ने लक्षद्वीपसाठी बुकिंग सुरू केले असून 'नेशन फर्स्ट', 'भारत फर्स्ट' दोन 'कूपन कोड' वापरून ग्राहकांना भरघोस सवलत मिळणार आहे. 'नेशन फर्स्ट', 'भारत फर्स्ट' या माध्यमातून सवलत कोड जाहीर केले आहेत. दरम्यान, मालदीवकरिता जाणाऱ्या सर्व फ्लाईट बुकिंग रद्द केले आहेत.

स्पाईकजेटचे सीईओ अजय सिंग यांनी घोषणा केली की स्पाइसजेट एअरलाइन लवकरच लक्षद्वीप आणि पवित्र शहर अयोध्येसाठी उड्डाणे सुरू करेल. या पार्श्वभूमीवर 'इझ माय ट्रिप'चे Easy Trip Planners चे शेअर्स ११जानेवारी रोजी १४ टक्क्यांहून अधिक वाढले.