आदर्श शिंदे यांच्या आवाजातील प्रभू श्रीराम' गाणे प्रदर्शित

    10-Jan-2024
Total Views |

adarsh shinde 
 
मुंबई : अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यामुळे संपुर्ण देश सध्या राममय झाला आहे. श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि हा महत्वाचा दिवस साधत प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. यात गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील प्रभू श्रीराम हे गाणे श्रोत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
 
प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे. अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्याला असलेलं संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारं आहे.
 
प्रभू श्रीराम या गाण्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या ‘प्रभू श्रीराम’ या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला नक्कीच उधाण येणार आहे.