पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच: विखे पाटील

    08-Sep-2023
Total Views |

Vikhe Patil  
 
 
मुंबई : धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे यांनी आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात जाऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांवर भंडाऱ्याची उधळण केली. त्यावेळी त्यांना सुरक्षा रक्षक आणि भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मारहाण केली. यावर आता विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
 
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "भंडारा हा कायम पवित्रच मानला जातो. त्या पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली, याचा मला आनंदच आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची एक पद्धत असते. त्यामुळे त्यांनी काही वावगं केलं असं मला वाटत नाही. पण, राजकीय हस्तक्षेपामुळे आरक्षणाबाबतचे गांभीर्य संपत चालले आहे. माझी मराठा आणि धनगर समाज बांधवांना विनंती आहे की, समाजाच्या भावना इथपर्यंत आपण आदर करतो. पण, पाठीमागे राहून काही राजकीय लोक त्याचा गैरफायदा घेतात, हे दुर्दैवी आहे. त्यातून समाजाला न्याय मिळत नाही. आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील आहे." असं विखे पाटील म्हणाले.