मराठा समाजपाठोपाठ आता धनगर समाजही आक्रमक!

राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा

    08-Sep-2023
Total Views |
 
Radhakrishna Vikhe Patil
 
 
सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता धनगर समाजाने ही आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने संतापलेल्या धनगर समाजातील कार्यकर्त्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला आहे.
 
सोलापूर दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेल्या धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील काही व्यक्तींनी विखेंवर भंडारा उधळल्याचा प्रकार घडला आहे. धनगर आरक्षणाची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी विखेंची भेट घेणाऱ्या मंडळींनी येळकोट येळकोट जय मल्हार घोषणा देत विखेंवर भंडारा उधळला आहे.
 
अचानक घडलेल्या या प्रकारानंतर विखेंच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलनाकर्त्याला बाजूला घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतर प्रश्न सोडवण्याची मागणीही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.