जगभरातील राष्ट्रप्रमुखांची दिल्लीत मांदियाळी; स्वागतासाठी केंद्रीय मंत्र्यांची फौज तैनात
08-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील देशांचे राष्ट्रप्रमुख राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, इटालियन पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस आणि आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएवा हे जी-२० शिखर परिषदेसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.
सर्व नेत्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय मंत्र्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. स्वागतानंतर, पाहुण्यांनाच्या स्वागतावेळी पारंपारिक नृत्य सादर करण्यात आले. जॉर्जिया मेलोनी यांचे स्वागत केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केले. तर शेख हसीना यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश विमानतळावर हजर होत्या.
त्याचवेळी पंतप्रधान ऋषी सुनक यांचे केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी स्वागत केले तर अल्बर्टो फर्नांडिस यांचे केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी स्वागत केले. कोमोरोसचे अध्यक्ष अझाली असौमानी हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. काहीवेळातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील दिल्लीत दाखल होतील.