नसरुद्दीन शाह ओटीटीवरील 'या' वेब सीरीजमध्ये कुटुंबासमवेत दिसणार

    08-Sep-2023
Total Views |

nasaruddin shah
 
मुंबई : अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अशीच एक वेगळी भूमिका वेब मालिकेच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसाठी घेऊन आल आहेत. सोनी लिव्हवरील ‘चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’ या बहुप्रतिक्षित थ्रिलर वेब मालिकेत ते आपल्या संपुर्ण कुटुंबासमवेत दिसणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विशाल भारद्वाज प्रेक्षकांना एका रोमांचक प्रवासाची सफर घडवणार आहेत. नुकताच या मालिकेचा ट्रेलर लाँच झाला.
 
‘चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’मध्ये पहिल्यांदाच नसीरुद्दीन शाह, त्यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह आणि त्यांचे दोन सुपुत्र, विवान शाह आणि इमाद शाह एकत्रित काम करणार आहेत. तसेच, यात नीना गुप्ता, लारा दत्ता, गुलशन ग्रोव्हर, वामिका गब्बी, प्रियांशू पैन्युली, चंदन रॉय सन्याल आणि पाओली दाम महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित पर्वतांमध्ये या वेब मालिकेचे चित्रिकरण केले असून ही मालिका चार्ली चोप्राचा प्रवास आणि एक डार्क सिक्रेट उलगडणार आहे.