नवी दिल्ली : G-20 शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीत होणार आहे. त्यावेळी सुरक्षेसाठी राफेल, सुखोई आणि इतर लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. भारताने अमेरिकेला ३१ हंटर किलर ड्रोनची देण्याची विनंतीही केली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाने दूरस्थ पायलट विमान प्रणालीसह ३१ 'हंटर किलर' खरेदीसाठी अमेरिकन सरकारला LOR (लेटर ऑफ रिक्वेस्ट) पाठवले आहे. या पत्रात, MQ9B रीपर किंवा प्रीडेटर-B शस्त्र पॅकेज, मोबाइल ग्राउंड कंट्रोल सिस्टम आणि इतर उपकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
आता बायडेन सरकार फॉरेन मिलिटरी सेल्स (FMS) कार्यक्रमांतर्गत या पत्राबाबत अमेरिकन काँग्रेसला एक-दोन महिन्यांत उत्तर देईल. यानंतर भारत आणि अमेरिका आपापसात चर्चा करून 'हंटर किलर' ड्रोनची किंमत ठरवतील. भारत सरकारकडून खरेदी करण्याच्या प्रस्तावित ड्रोनपैकी १५ सी गार्डियन नौदलाला आणि १६ स्काय गार्डियन लष्कर आणि हवाई दलाला देण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने १५ जून रोजी सांगितले होते की या करारासाठी सुमारे $ 3.1 अब्ज खर्च येईल.
G-20 सुरक्षेसाठी फायटर जेट तैनात
भारत सरकार G-20 परिषदेच्या सुरक्षेबाबत सर्वेात्तम व्यवस्था केली आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाने सध्या पाकिस्तान-चीन सीमेवर सुरू असलेला 'त्रिशूल' सराव थांबवला आहे. याशिवाय राफेल, मिराज, चिनूक, अपाचे, गरूण आणि इतर लढाऊ विमाने दिल्ली आणि परिसरात तैनात करण्यात आली आहेत.