पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात पदभरती सुरू

    07-Sep-2023
Total Views |
Panvel Municipal Corporation Recruitment 2023

मुंबई :
पनवेल महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. महापालिकेकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील प्रकल्प अंमलबजावणी आराखडा २०३३-२३ नुसार मंजूर करण्यात आलेली पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

दरम्यान, पनवेल महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी स्वरूपात करार पध्दतीने वेतनतत्वावर नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, या पदभरती प्रक्रियेद्वारे इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या नेमणुका महापालिकेतील गठीत केलेल्या समितीमार्फत थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत.

यासाठी दि. १३ सप्टेंबर २०२३ पासून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत थेट मुलाखती आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, या पदभरतीसंदर्भातील अधिक माहिती पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

Panvel Municipal Corporation Recruitment 2023