मुंबई : काजुपाडा गोविंदा पथक तर्फे आयोजित दही हंडी 2023 अंतर्गत चांदीवली येथील काजुपाडा पाईपलाईन येथे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे जिल्हा सचिव एड कैलास आगवणे यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. आयोजक हीरा पुजारी असून यावेळी रत्नाकर शेट्टी, शशांक मस्के आणि अन्य मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सदर पथक संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी जाऊन दही हंडी सोहळयात भाग घेतात.