म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची त्रिसूत्री

    07-Sep-2023
Total Views |
Article On Mutual Fund Investment Plans

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बर्‍याच निकषांचा खरं तर काळजीपूर्वक विचार करावा लागतो. तेव्हा, गुंतवणूदारांनी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना या लेखात दिलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास गुंतवणुकीचा निर्णय घेणे अधिक सोयीस्कर...

‘एफडी’ किंवा ‘डेट फंडा’त गुंतवणूक करणे

प्रत्येक गुंतवणूकदाराची उद्दिष्टे वेगवेगळी असतात आणि खास असतात. म्हणून ‘एफडी’ आणि ‘डेट फंड’ यांच्यातील तुलना करुन गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. प्रत्येक पर्यायाचे मूल्यमापन करण्यासाठी एक चौकट असणे आवश्यक आहे. ‘डेट’मुळे ‘म्युच्युअल फंड’ दरचक्र आणि ‘यील्ड कर्व्ह’ हालचाली यांच्यावर आधारित असलेले धोरणात्मक व्यवस्थापनाचे फायदे मिळतात. ‘डेट फंडां’तर्फे विभागाच्या स्तरावर विविधीकरण (सेगमेंट लेव्हल डायव्हर्सिफिकेशन), फंड व्यवस्थपनाची कौशल्ये आणि रोकडसुलभता (लिक्विडिटी) हे महत्त्वाचे फायदे मिळतात. त्यांची जोखीम घेण्याची क्षमता आणि ध्येयच्या प्रमाणावर अवलंबून, गुंतवणूकदारांना विशिष्ट ‘डेट म्युच्युअल फंडां’ची निवड गुंतवणुकीसाठी करता येईल. व्याजदर सध्या शिगेला पोहोचले असून, महागाई कमी होऊ लागली आहे. परिपक्वतेपर्यंत अधिक उत्पन्न (वायटीएम) असलेल्या ‘डेट फंडां’मुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ‘डेट फंड’ गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये संपत्ती वाटपात लवचिकता उपलब्ध करून देतात. व्याजदराच्या हालचालींचा थेट परिणाम एफडी दरांवर होतो. ‘एफडी’मध्ये कोणतेही धोरणात्मक व्यवस्थापन नसल्याने व्याजदर कपातीच्या काळात गुंतवणूकदारांवर विपरित परिणाम होऊ शकतो. ‘डेट फंडा’त गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना ‘डेट मार्केट’मधील सध्याच्या संधीचा विचार करता येईल.

एखाद्याने फंडात गुंतवणूक करताना लक्षात ठेवले पाहिजेत असे घटक

‘मागील कामगिरी’ ही त्या फंडाची कामगिरी त्याच्या मापदंडाच्या (बेंचमार्कच्या) तुलनेत मोजण्यासाठी एक सूचक घटक आहे आणि गुंतवणूकदारांनी ती पाहावी. गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता निश्चित करण्यापासून सुरुवात केली पाहिजे. त्यांचे एकूण उद्दिष्ट साध्य करण्यास त्यांना मदत करू शकतील, अशी उत्पादने निवडली पाहिजेत. उदाहरणार्थ, ‘इक्विटी’ फंडात गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची उद्दिष्टे अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील. फंड निवडताना इतर काही बाबींचा विचार केला पाहिजे, ज्या आहेत-बाजार चक्रातील (मार्केट सायकल धील) फंडाची कामगिरी, जोखीम आणि अस्थिरता प्रोफाईल, विविधीकरण आणि पोर्टफोलिओमधील इतर फंडांशी पूरकता.

नवीन गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीचे चांगले माध्यम

सध्याच्या युगात गुंतवणूकदार अधिक तंत्रज्ञानप्रेमी झाले असून, मनोरंजनापासून ते फोन बँकिंग आणि आर्थिक गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल फोन हे एकाच ठिकाणी सगळे (वन स्टॉप शॉप) बनले आहे. गुंतवणूकदार काळानुसार विकसित झाले आहेत आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या विविध वित्तीय उत्पादनांच्या बाबतीत जागरूक आहेत. ‘डू-इट-युअरसेल्फ’ (डीआयवाय) गुंतवणूकदार आवडीने स्वतःचे संशोधन करतात आणि त्यानुसार त्यांच्या उद्दिष्टांना अनुसरून विविध उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात. नवीन प्रारंभ करणार्‍या गुंतवणूकदारांना ‘म्युच्युअल फंड’ सल्लागाराचा सल्ला घेता येईल. हे त्यांना त्यांची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीच्या प्रमाणानुसार वैयक्तिक गुंतवणूक लक्ष्य योजना तयार करण्यात मदत करतील. सल्लागार गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओचे अतिप्रमाणात विविधीकरण किंवा अतिप्रमाणात एकाच ठिकाणी गुंतवणूक करणे टाळण्यास मदत करू शकतात. जेव्हा बाजार अस्थिर असतो, तेव्हा बरेच नवीन गुंतवणूकदारांना चिंता लागते, अशा परिस्थितीत ते त्यांना बाजारातील अस्थिरतेतून पुढे जाण्याससुद्धा मदत करू शकतात. हे त्यांना त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करण्यास आणि गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार उद्दिष्टे बदलण्यास मदत करते.

अजय अर्गल
(लेखक वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापक, इमर्जिंग मार्केट्स इक्विटी - इंडिया, फ्रँकलिन टेम्पलटन आहेत.)