कालबाह्य मुरल्यावर?

    07-Sep-2023   
Total Views |
Article On Government of Maharashtra Maratha Reservation

‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा १५ ते १६ टक्के आणखीन वाढवा,’ असे शरद पवार म्हणतात. समजा, मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्याने तरतूद केली आणि जर आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढवले, तर संविधानामध्ये बदल करणारे मोदी, भाजप आणि फडणवीस कोण? ते काय संविधानापेक्षा मोठे झाले का? असे म्हणत समाजाला उकसवण्यामध्ये आणि ‘संविधान बचाव‘ म्हणत आंदोलन पेटवायला पुढे कोण असेल, हे सांगायला हवे का? पवार इतक्या तडफेने आरक्षणाबद्दल का बोलत होते, याचे उत्तर स्पष्ट आहे. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या गुणवत्तेबाबत पवारांना खात्री आहे. महाराष्ट्रात शांती राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोबत एकनाथ शिंदे आणि आता अजित पवारही एकत्रितरित्या निर्णय घेतील. मराठा समाज आक्रमक असला, तरी समाजविघातक नाही. त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी, समाजहितासाठी मराठा समाजही कदाचित समन्वयाच्या भूमिकेत येईल. मग भाजपवर महाराष्ट्राचा आणखीन विश्वास बसेल. २०२४ पुन्हा सत्तेबाहेर राहावे लागेल. त्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षणासाठी चेतवत राहणे योग्य, असे पवारांना वाटले असावे. पवारांचा विश्वास खराही ठरला. नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी समाजाचा दाखला मिळेल असा कालच निर्णय सरकारने घेतला. काही लोक म्हणतात की, इतकी वर्षे काँग्रेस सत्तेत होती, अगदी केंद्रात आणि राज्यातही. पवार तर स्वतः अनेकदा मुख्यमंत्रीही होते. मग तेव्हा मराठा आरक्षणाबाबतची काळजी पवारांना वाटत नव्हती का? आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे, पवार जेव्हा सत्तेत नसतात, तेव्हाच आरक्षण, पिकाचे भाव, रोजगार, सवलतीसाठी काही लोक आंदोलन वगैरे का करतात? भाजप सत्तेत असतानाच ही सगळी आंदोलनं, मागण्या का बरं केल्या जातात, हासुद्धा महाराष्ट्राला पडलेला एक मोठा प्रश्न. १२ नव्हे तर १३ बॉम्बस्फोट झाले, असे म्हणत हिंदूंच्या भयंकर संकट काळातही खोटे बोलणारे पवार हे नेहमी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेतात. मिरवताना मात्र मिरवतात मराठा समाजाचे नेते म्हणूनच. असो. पवार असले म्हणून काय झाले? सगळेच नेहमीच मर्जीनुसार होते का? त्यामुळेच वयोवृद्ध पवारांना काल-परवा आंदोलकांकडून बरेच आक्षेपार्ह शब्द ऐकून रोष पत्करावा लागला. राजकारणात मुरलेले पवार. पण, किती काळ मुरावे यालाही मर्यादा आहेच ना? कालबाह्य मुरल्यावर काय होते, हे माहिती आहे ना?

मटण खा, यात्रा कर...

चंपारण मटण बनवायला शिकलो मम्मा. लालू आजोबांनी शिकवलं. काय म्हणतेस, त्या हिंदू लोकांचा श्रावण असतो? या महिन्यात ते हिंदू लोक मांसाहर करीत नाहीत मम्मा? पण, लालू आजोबांनी मला ‘स्पेशल रेसिपी’ म्हणून मटन बनवायला शिकवले. मला कुठे माहिती की, हिंदू लोकांसाठी श्रावण महिना पवित्र असतो ते. ते लालू आजोबा पण हिंदू आहेत ना? काय त्यांना पण आपल्यासारखेच हिंदूंपेक्षा मुसलमान भाईंची मत मिळवायची आहेत? काय म्हणते मम्मा? माझी पंचायत झाली. हो ते मी स्वतःला जनेऊधारी ब्राह्मण आहे, असे सांगतो आणि मीच श्रावण महिन्यात मांसाहार करतो, हे लोकांना समजले म्हणून ना? पण, मम्मा मीच काय? दीदीने पण मटन खाल्ले. ती पण तर देवळात जाते, असे लोकांना दाखवत असते. मम्मा मी हिंदू आहे, हे लोकांना उल्लू बनवण्यासाठी म्हणत असतो, हे लोकांना पण माहिती असेल का? काय म्हणते, मम्मा होय रे लेकरा लोक तुला गांभीर्याने घेत नाहीत. जाऊ दे मम्मा, तुला गंमत सांगू का? पंतप्रधान व्हायचे म्हणून, मी देशात काय घडले याबद्दलची ‘हेडलाईन’ चाळत होतो. तेव्हा लालू आजोबांनी चारा खाल्ला, चारा खाल्ला, असं सारखं वाचलं होतं. ‘सिक्रेट स्पेशल फूड डिश’ कोणती म्हटल्यावर लालू आजोबा मला ‘चारा डिश’ बनवायला शिकवतील, असे वाटले. पण, त्यांनी ‘चारा डिश’चे नावही काढले नाही. त्या बदल्यात मला मटन डिश शिकवली. काय असते गं, त्या चारा डिशमध्ये? मम्मी, ते बघ कोण तरी म्हणते आहे की, ‘चारा डिश’ ही ‘बोफोर्स डिश’ आणि ‘हेरॉल्ड डिश’ सारखीच आहे. मम्मा, आणखीन एक मी लालू आजोबांना सांगितले की, मला थाय फूड आवडते. नाहीतर ते मोदी मागे अमेरिकेमध्ये गेले होते, तर नवरात्री की काय होते म्हणून पाणीसुद्धा प्यायले नाहीत. मम्मा, ते असं का करतात, कधी हिमालयात जातात, कधी उपवास करतात. पक्के हिंदूंच आहेत. मम्मी, आता निवडणुका परत कधी आहेत? २०२४ साली? ओ शिट, आता परत जनेऊ घालण्याची वेळ झाली. मम्मा, बघ कुणीतरी म्हणतायेत की, म्हणूनच २०२४ साली पुन्हा मोदीच! मम्मा, ते बघ सारखं म्हणतायेत मटण खा, जनेऊ घाल, यात्रा कर जत्रा कर येणार तर मोदीच!

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.