'आदित्य एल-१'च्याबाबतीत इस्त्रोने दिली मोठी अपडेट!
07-Sep-2023
Total Views | 155
मुंबई : २ सप्टेंबर रोजी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या आदित्य एल-१ ने पृथ्वीवर आपला पहिला फोटो पाठवला आहे. आदित्य एल-१ ने अवकाशात पृथ्वी आणि चंद्रासोबत सेल्फी घेतला आहे. आदित्य एल-१ सेल्फी घेत असतानाचा व्हीडिओ इस्त्रोने शेअर केला आहे.
४१ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये आदित्य एल-१ ने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतरही दाखवले आहे. इतकेच नाही तर इस्रोने सांगितले की, आदित्य एल-१ मध्ये स्थापित केलेल्या ७ पेलोडपैकी, दोन दृश्यमान उत्सर्जन लाइन कोरोनाग्राफ (व्हीईएलसी) आणि सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (एलयूआयटी) चे चित्र देखील व्हिडिओमध्ये दाखवले गेले आहेत.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य एल-१ने मंगळवारी पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित दुसरी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता आदित्य एल-१ १० सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल. पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत आदित्य एल-१ च्या आगमनाची वेळ रात्री अडीच वाजता निश्चित करण्यात आली आहे. हे मिशन सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.