नव्या संसद भवनात होणार विशेष अधिवेशन! गणेश चतुर्थीचा मुहूर्त!
06-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन १९ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसद भवनात होणार आहे. संसदेचे ५ दिवसांचे विशेष अधिवेशन १८ तारखेपासून सुरु होणार आहे. १८ तारखेला संसद सत्र जुन्या संसद भवनात आयोजित केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जून रोजी संसदेच्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन केले होते. गेल्या आठवड्यात, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान असेल. अशी माहिती सोशल मिडीयावर दिली होती.
तेव्हापासून या विशेष अधिवेशनात सरकार कोणती विधेयक मांडणार याचा अंदाज बांधला जात आहे. सरकारकडून याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या अधिवेशनात सरकार महिला आरक्षण आणि 'एक राष्ट्र-एक निवडणूक' यासाठी विधेयक संसदेत मांडणार आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे.