किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांचे समन्स

    06-Sep-2023
Total Views |

Kishori Pednekar 
 
 
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असुन मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. बॉडीबॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांना समन्स पाठवले आहे. पेडणेकर यांना 11 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
यापूर्वी किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅग्ज खरेदीतही घोटाळा झाला होता. करोनाकाळात महापालिकेची १३ जम्बो करोना केंद्रे, २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ३० रुग्णालयांच्या माध्यमातून कथित १२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचाही संशय असून, या प्रकरणाचा ईडीकडूनही तपास करण्यात येत आहे. 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली होती.