'आदित्य एल १'च्या दुसऱ्या पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात!
05-Sep-2023
Total Views | 29
मुंबई : भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण शनिवारी, सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले. सूर्याभ्यासासाठी निघालेले हे यान १५ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून एल १ पॉइंट पर्यंत पोहचणार आहे.
आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी आदित्यने दुसरे अर्थ-बाउंड मॅन्यूव्हर म्हणजेच पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश केल्याचे इस्रोने ट्विटकरून सांगितले आहे. इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कच्या (ISTRAC) मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथे असलेल्या आयएसटीआरएसीच्या ग्राउंड स्टेशनने या उपग्रहाचा मागोवा घेतला आहे.
ते आता पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर २८२ किमी आणि पृथ्वीभोवती सर्वात दूर असलेल्या ४०२२५ किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. तसेच 'आदित्य एल १' उपग्रह 10 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार, दुपारी २ वाजून ३० मिनीटांनी पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश करणार असल्याचं इस्रोने सांगितले आहे.
या माहितीनुसार पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून भारताने मोहिमेच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे.