“सैफने मला या भूमिकेसाठी मोलाचा सल्ला दिला”, करिनाने दिली कबूली
05-Sep-2023
Total Views |
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेल्या प्रत्येक अभिनेत्रींनी सध्या ओटीटीची वाट धरल्याचे दिसून येते. अभिनेत्री करीना कपूर खान हिने नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर पदार्पण केले असून सुजॉय घोष यांच्या 'जाने जा' या चित्रपटाच्या निमित्ताने ती डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. कहाणी, बदला अशा प्रकारच्या थ्रिलर गोष्टी आपल्या चित्रपटातून मांडणारे दिग्दर्शक चित्रपटांचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी 'जाने जा' या चित्रपटाच प्रेमाची वेगळी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात सैफ अली खान याने मला अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्यासोबत काम करणार असल्यामुळे माझ्या पात्राचा अभ्यास करुन जाण्याची गरज आहे असा सल्ला दिल्याची माहिती करिनाने दिली. “जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांनी आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. नैसर्गिक अभिनय करणाऱ्या मोजक्या दिग्गज कलाकारांच्या यादीत या दोन्ही अभिनेत्यांचा सहभाग होत असल्यामुले तु पिकनिकला नाही तर एका महत्वाच्या चित्रपटाचा भाग होणार असल्यामुळे त्याचे गांभीर्य लक्षात ठेव आणि ही भूमिका उत्तमरित्या निभाव”, असा मोलाचा सल्ला सैफने दिल्याची कबूली करिनाने दिली.
करिना कपूर-खान, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच सस्पेन्स, प्रेम या दोन्ही गोष्टींचा मिलाप दिसून येतो. या चित्रपटात करिनाने आईच्या भूमिकेत असून जयदीप शिक्षक आणि विजय पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहेत. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.