मुंबई : 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. या माध्यमातून तरुणांना एसबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भरावयाचे आहेत. 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मधील असिस्टंट डेटा प्रोटेक्शन ऑफिसर आणि डेटा प्रोटेक्शन ऑफिसर या पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, एसबीआय अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्जाची ऑनलाइन नोंदणी आणि शुल्काचा ऑनलाइन भरणा करण्याची मुदत दि. ०२ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. तसेच, ही सर्व रिक्त पदे कंत्राटी पध्दतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी एसबीआयच्या
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
डेटा प्रोटेक्शन ऑफिसर या पदाकरिता वयोमर्यादा ४० ते ५५ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली असून असिस्टंट डेटा प्रोटेक्शन ऑफिसर या पदासाठी ३५ ते ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच, उमेदवार निवडीची प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, मुलाखत यामार्फत करण्यात येणार आहे. तर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.