चांद्रयान 3 मोहीम : प्रज्ञान रोव्हर ‘स्लीप मोड’मध्ये, २२ सप्टेंबरला पुन्हा सक्रिय करण्याचे 'इस्रो' प्रयत्न करणार

    03-Sep-2023
Total Views |
Chandrayaan 3 Mission Pragyan Rover At Sleep Mode

मुंबई :
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो'ने चांद्रयान ३ या मोहिमेतंर्गत दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचे यशस्वी लँडिंग केले. त्यानंतर आतापर्यंत विक्रम लँडरच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाविषयी नवनवीन माहिती पाठवत होता. त्यासंदर्भातील तपशील ' इस्त्रो'ने अधिकृतरित्या जाहीर केला.

दरम्यान, १४ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत प्रज्ञान रोव्हरने आफले काम पूर्ण केले आहे. तसेच, ते आता सुरक्षितपणे पार्क करून रोव्हर स्लीप मोडवर सेट केला आहे, असे 'इस्त्रो'ककडून स्पष्ट करण्यात आले आहे. चंद्रावर १४ दिवसांची रात्र आता सुरु होणार असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे २३८ अंश सेल्सियसपर्यंत घसरते.
 
त्यामुळे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, चंद्राच्या रात्री थंडीत लँडरची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा खराब झाली नाही तर पुन्हा १४ दिवसांनंतर म्हणजेच दि. २२ सप्टेंबरला सुर्यप्रकाशात लँडर पुन्हा एकदा सक्रिय करण्याच प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी सांगितले की, विक्रम लँडरचे प्रज्ञान रोव्हर मॉड्यूल ‘स्लीप मोड’ वर ठेवण्यात आले आहे. (इस्रो)ने असेही सांगितले की पुढील सूर्योदय दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी अपेक्षित आहे.