दूरसंचार विभागात नोकरीची संधी, विविध पदांसाठी आजच अर्ज करा

    27-Sep-2023
Total Views |
Department of Telecom Recruitment 2023

मुंबई :
दूरसंचार विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून दूरसंचार विभागातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

दूरसंचार विभाग पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली असून वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक पदाच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स. महाराष्ट्र आणि गोवा. बीएसएनएल प्रशासकीय इमारत, 3 मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम. मुंबई-४०००५४.

तसेच, दूरसंचार विभागातील विविध पदांच्या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.