बेस्टच्या ताफ्यात २५० सिंगल डेकर एसी बस

बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यातील एसी बस वाढवल्या

    27-Sep-2023
Total Views |

AC bus


मुंबई :
मुंबईच्या बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यातील एसी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात आणखी २५० सिंगल डेकर एसी बस ताफ्यात दाखल करणार आहे. त्यासाठी २७ सप्टेंबर पासून निविदा जारी केली जाणार आहे. या बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. या उपक्रमासाठी बेस्टला १ हजार ३२३ कोटी रुपयांहून अधिक खर्च मोजावा लागणार आहे.
 
बेस्टच्या २५० सिंगल डेकर एसी बससाठी निविदा भरण्याची अंतिम मुदत ही १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण २ हजार ९७८ बस आहेत. यापैकी भाडेतत्त्वावरील १ हजार २७९ एसी बस आहेत. यामध्ये बेस्टच्या मालकीच्या केवळ २५ बस आहेत. भविष्यात फक्त एसी बस चालवण्याचे उद्दिष्ट उपक्रमाने ठेवले आहे. सन २०२७ पर्यंत बेस्ट बसचा ताफा दहा हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.