ठाणे : अनंत चतुर्दशी निमित्त उद्या दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.