आरबीआय कडून पुन्हा रेपो रेट जैसे थे ठेवण्याची दाट शक्यता - अर्थतज्ज्ञ
मुंबई:रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो रेट जैसे थे ठेवण्याची दाट शक्यता आहे. सलग चौथ्या वेळेस येणाऱ्या आगामी आर्थिक वित्तीय धोरणात रेपो मध्ये कुठलाही बदल करणार नसल्याचे आर्थिक तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.जागतिक पातळीवर वाढलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व युएस फेडरल बँकेची भुमिका हे विचारात घेता आरबीआय द्विवीय महिना बैठकीत रेपो दर स्थिर ठेवू शकते असा अंदाज आर्थिक तज्ञ मंडळींनी नोंदवला आहे.
फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६.५ टक्के ठेवला होता.अजूनही हाच रेपो दर चालू असल्याने यावर अंदाज व्यक्त करण्यात येत होते.आरबीआयच्या सहा सदस्यीय समितीची पुढील बैठक ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याची माहिती मिळत असून यापूर्वीची बैठक ऑगस्ट महिन्यात झाली होती.
घाऊक बाजारातील महागाईचा Consumer Price Index (CPI) हा जुलैमध्ये ७.४४ वरून ६.८३ % वर आला होता.